लोकसेवेतून जननेतृत्वाकडे दत्ता शेगर यांचे समाजकारण आता राजकारणाच्या दिशेने; विधानपरिषदेच्या माध्यमातून समाजहित जपण्याचा निर्धार!

आर्णी : तालुक्यात व यवतमाळ जिल्ह्यात आपल्या निस्वार्थी समाजसेवेने, प्रामाणिक नेतृत्वाने आणि जनहिताच्या कार्यामुळे सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले ‘श्री गुरुदत्त डेव्हलपर्स’चे सर्वेसर्वा दत्ता शेगर हे आता लोकसेवेकडून जननेतृत्वाकडे वाटचाल करत आहेत. प्रसिद्धीचा कोणताही बडेजाव न माजवता समाजातील शेवटच्या घटकाला मदत करणारे दत्ता शेगर आता राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत असून, विधानपरिषदेच्या माध्यमातून थेट शासनदरबारी समाजबांधवांचे प्रश्न मांडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. दत्ता शेगर यांचे समाजकार्य केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्याचा विस्तार खूप मोठा आहे. महाराष्ट्रातील ‘नाथ जोगी’ समाज बांधवांच्या धार्मिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी आपल्या मूळ गावी भंडारी (ज) येथे स्वखर्चातून एका भव्य मंदिराची उभारणी केली आहे. यासोबतच, आरोग्याच्या सुविधेपासून वंचित असलेल्या सारखणी (जि. किनवट) येथील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यांनी स्वखर्चातून एक ‘मिनी ॲम्ब्युलन्स’ (रुग्णवाहिका) उपलब्ध करून दिली आहे, जी आज शेकडो रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. आर्णी येथील स्वर्गीय सुशिलाबाई नागापुरे मातोश्री वृद्धाश्रमाला वेळोवेळी आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत देणे, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करणे, तसेच विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना सढळ हाताने आर्थिक सहकार्य करणे ही त्यांच्या दैनंदिन समाजकार्याची ठळक ओळख बनली आहे. समाजासाठी समर्पित राहून, जात-पात न मानता सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.केवळ वैयक्तिक पातळीवर मदत करण्यापेक्षा समाजाच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याच्या आणि शासनाच्या पटलावर मांडण्यासाठी दत्ता शेगर यांनी आता राजकीय प्रवासाची तयारी सुरू केली आहे. भविष्यात “विधानपरिषदेत” (आमदार म्हणून) पोहोचून उपेक्षित समाजाच्या आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी प्रभावीपणे काम करणे, हेच त्यांचे मुख्य ध्येय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या समाज बांधवांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. डोळ्यावर काळा गॉगल आणि मितभाषी स्वभाव; हीच खरी ओळख !नेहमी शांत व मितभाषी स्वभाव, डोळ्यावरचा काळा गॉगल आणि शब्दांपेक्षा थेट कृतीतून बोलणारे एक करारी व्यक्तिमत्त्व, हीच दत्ताभाऊ शेगर यांची समाजात खास ओळख आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा प्रत्यक्ष कामाला अधिक महत्त्व देणाऱ्या दत्ताभाऊंनी जनतेच्या मनात आदराचे व विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे हे व्यापक होत जाणारे कार्य आगामी काळात समाजाच्या प्रगतीसाठी एक नवा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment