दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

जन बदलाव / प्रतिनिधि

महसूल भवनात प्रतिमेस पुष्पहार अर्पण; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वाहिली आदरांजली

यवतमाळ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, प्रशासनातील कार्यपद्धती तसेच राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उपस्थितांनी स्मरण केला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

या अभिवादन कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रम शांत व श्रद्धापूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

Leave a Comment